मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक या पदावर पदोन्नती साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक | Diploma in school management (DSM)

मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक या पदावर पदोन्नती साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक 




प्रस्तावना :- 

       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने महाराष्ट्रातील माध्यमिक स्तरावरील मुख्याध्यापक पदावर काम करतांना येणा-या अडचणी विचारात घेऊन अत्यंत निकडीची गरज म्हणून सन १९९४ मध्ये शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.आतापर्यंत ज्यांनी शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम पूर्ण केला आहे त्यांना शालेय स्तरावरील दैनंदिन व्यवस्थापन व प्रशासन कुशलपणे हाताळण्यासाठो सदर अभ्यासक्रम फारच उपयुक्त ठरत असल्याचे आढळून येत आहे.सध्याच्या नियमावलीत शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देताना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कोणतीही तरतुद नाही. त्यामुळे अननुभवी व व्यवस्थापन शास्त्राचे ज्ञान नसलेले शिक्षक मुख्याध्यापकपदी पदोन्नत झाल्याने प्रशासनावर त्यांची पकड रहात नाही, ही वस्तुस्थिती आहे.सदर वस्तुस्थिती विचारात घेता पदोन्नतीपूर्वी शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम हया अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. यास्तव राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांतील उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना सदर अभ्यासक्रम बंधनकारक करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


शासन निर्णय:- 


       शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे हे ही शासनाचे उद्दीष्ट आहे. या दृष्टिकोनातून राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व अध्यापक विद्यालयातील उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना त्यांची जबाबदारी अधिक चांगल्यारीतीने पार पाडण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने तयार केलेला व त्यांच्या मार्फतच पत्रद्वारा राबविण्यात येणारा एक वर्षाचा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २००४-०५ पासून नियुक्त होणा-या उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना पुढील ५ वर्षात पूर्ण करणे आवश्यक राहील. शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रमाकरीता सदर विद्यापीठातर्फे रु.१०००/- इतके शुल्क आकारण्यात येणार असून याची प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदानातून करण्यास मान्यता देण्यात येत आहे.भविष्यात उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीस पात्र ठरणा-या तसेच भविष्यात सदर पदावर नियुक्त होणा-या अर्हताप्राप्त शिक्षकांना हा अभ्यासक्रम स्वखर्चाने पूर्ण करणे आवश्यक आहे.

 शासन निर्णय PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


              Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने