मुख्याध्यापकांची गणवेश खरेदीसाठी होणारी धावपळ थांबणार ! | School uniform budget

मुख्याध्यापकांची गणवेश खरेदीसाठी होणारी धावपळ थांबणार !


 

आतापर्यंत शाळा स्तरावरून होणारी

गणवेश खरेदी येत्या शैक्षणिक वर्षात

राज्यस्तरावरून होण्याची शक्यता

आहे. राज्यात शासकीय शाळांमध्ये

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत

गणवेशाचे कापड आणि बूट हे राज्य

स्तरावर खरेदी करण्याचा प्रस्ताव

शासनाच्या विचाराधीन आहे.

आतापर्यंत शासन शाळांना पैसे देत होते आणि शाळा व्यवस्थापन समित्या त्यांच्या स्तरावर गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटत होत्या. या पद्धतीत येत्या शैक्षणिक

वर्षापासून बदल होण्याची शक्यता आहे. काही अधिकाऱ्यांनी विकेंद्रीत खरेदी मधील निदर्शनास आणून दिल्याने नवीन शैक्षणिक वर्षात राज्य स्तरावर शासनाच्या गणवेश खरेदी होण्याची शक्यता आहे. 

राज्यस्तरावर एकच गणवेश?

सध्या शाळा व्यवस्थापन

समित्यांना गणवेश याचा प्रकार व

रंग ठरवण्याची स्वातंत्र्य आहे काही

जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेने ठरवून

दिलेले गणवेश आहेत.परंतु गणवेश खरेदी राज्यस्तरावरुन झाल्यास राज्यातील सर्व शासकीय

शाळांमध्ये एकाच प्रकारचा गणवेश लागू होईल.


या वर्षी सर्वांनाच मिळणार गणवेश?


 दरम्यान येत्या शैक्षणिक वर्षात सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती मधील आणि दारिद्र्य रेषेखालील मुले यांनाच गणवेश

मिळत होते. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश मिळणार आहेत.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने