बाल चित्रकला स्पर्धेचे स्कूल रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसे करावे...
नमस्कार शिक्षक मित्रहो,
शैक्षणिक सत्र 2025 26 पासून बालचित्रकला स्पर्धेचे फॉर्म हे ऑनलाईन मुख्याध्यापकांना भरावे लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम शाळेचे रजिस्ट्रेशन करून युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागणार आहे नंतर तो युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहे आणि लॉगिन झाल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करायचे आहे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची फीज देखील आपल्याला ऑनलाइन त्याच पोर्टलवर भरायचे आहे चला तर मग जाणून घेऊया वरील सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप...
विद्यार्थी माहिती भरण्यासाठी PDF नमुना याच पोस्टच्या शेवटी दिलेला आहे
स्टेप-1
सर्वप्रथम पुढील लिंक वर क्लिक करा.
Click Here
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसेल
स्टेप-2
वरील स्क्रीन मध्ये हायलाईट केलेला जो भाग आहे त्यावर ( स्कूल रजिस्ट्रेशन) वर क्लिक करावे. स्कूल रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक केल्यानतर आपणास पुढील स्क्रीन दिसेल.
वरील स्क्रीन मध्ये शाळेची संपूर्ण माहिती भरून मुख्याध्यापकांचे नाव मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर ईमेल आयडी तसेच कॉर्डिनेटर म्हणजेच शाळेतील एका शिक्षकाचे नाव त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आयडी या सर्व गोष्ट व्यवस्थित भरून घ्याव्यात आणि तदनंतर सबमिट बटन वर क्लिक करावे. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबर वर यूजर आयडी आणि पासवर्ड चा मेसेज येईल. आता हा युजर आयडी आणि पासवर्ड आपणास याच साइट वरती लॉगिन बटन वर क्लिक करून टाकायचा आहे त्यासाठी जाण्याचा पाठ पुढीलप्रमाणे...
स्टेप-3 याच वेबसाईटच्या होम पेजवर जावे त्या ठिकाणी पुढील इंटरफेस दिसेल.
वरील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या लॉगिन बटन वर क्लिक करावे. लॉगिन बटन वर क्लिक केल्यानंतर आपणास युजर आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल. या ठिकाणी आपणास मेसेज मध्ये आलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे. लॉगिन झाल्याच्या नंतर आपणास पुढील इंटरफेस दिसेल.
वरील दिसत असल्यास स्क्रीन मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये तीन रेषा आहेत त्यावरती क्लिक करावे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसेल.
स्टेप-4 वर दिसत असलेल्या स्क्रीनमध्ये कॅंडिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करावे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसेल.
वर दिसत असलेल्या स्क्रीनमध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती पालकाची पूर्ण नाव विद्यार्थ्यांची जन्मदिनांक पालकाचा मोबाईल नंबर आईचे नाव इत्यादी माहिती भरावी तदनंतर चेक बॉक्सला टिक करून सेव कॅंडिडेट या बटन वर क्लिक करावे. याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन गटानुसार करून घ्यावे. सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपणास या विद्यार्थ्यांची फीज देखील ऑनलाईन भरायची आहे त्यासाठी परत आपण डाव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या तीन रेषेवरती क्लिक करावे. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपणास पुढील इंटरफेस दिसेल.
वरील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करावे. तदनंतर आपली पेमेंट ऑप्शन निवडून पेमेंट करून घ्यावे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर जरी 20 रुपये फीस दिसत असली परंतु प्रत्यक्ष मात्र आपणास प्रति विद्यार्थी 15 रुपयाप्रमाणे पेमेंट करावे लागणार आहे पेमेंट झाल्याच्या नंतर आपण याच ठिकाणावरून पेमेंट लिस्ट डाऊनलोड करून घेऊ शकतो. तसेच याच इंटरफेस मधून आपण विद्यार्थ्यांची गटानुसार यादी देखील डाऊनलोड करू शकतो. अशाप्रकारे आपण विद्यार्थ्यांचे बालचित्रकला स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. यासाठी लागणारा पीडीएफ फॉरमॅट पुढे दिलेला आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी त्यावरती सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून घ्यावी तदनंतर आपणास वरील प्रोसेस करणे सोपे जाईल. चित्रकला स्पर्धेसाठी आवश्यक असणारी माहिती माहिती भरण्यासाठी लागणारे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा.