सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात नवीन विषयाचा समावेश!

 सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात नवीन विषयाचा समावेश! 



नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात! 



राज्यात आणि देशात सध्या नवीन शैक्षणिक धोरणाचा जोरदार चर्चा सुरू आहे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख जवळ येत आहे त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणातील विविध गोष्टी समोर येत आहे. आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात नवीन बदल करण्यात येणार आहे.

शाळेतील मुलांना व्यवसायाभिमुख विषयाची ओळख व्हावी त्यांना विविध व्यवसायिक अभ्यासक्रम माहीत व्हावेत म्हणून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाणार आहे.


 

त्यानुसार राज्यातील 65 हजार सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये हा व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. आठवीच्या इयत्तेनंतर  अभ्यासक्रम जास्त असल्यामुळे राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमासोबत आपले भविष्य घडवायचे आहे अशा विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी शालेय जीवनातच मिळणार आहे त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अनेक करिअरच्या निवडण्याच्या संधी मिळणार आहे.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने