संवर्ग-१ आणि संवर्ग-२ यांनी अर्ज कसा भरावा-जिल्हांतर्गतबदली प्रक्रिया

संवर्ग-१ आणि संवर्ग-२ यांनी अर्ज कसा भरावा...


बदली प्रक्रिया अपडेट
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✳️ 2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.

✳️ बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास* *विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.

✳️ विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया

➡️ पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल

➡️ या टॅब वर क्लिक केले की application form  टॅब दिसू लागेल.

➡️ त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व  apply cadre 2
हे दोन टॅब दिसतील.

➡️ जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2  वर क्लिक करावे.

➡️ Apply cadre 1  वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल.

➡️ विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल.

➡️ शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील
व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार
त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार
जन्मतारखेप्रमाणे
व आडनावातील पहिल्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे
वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल.

➡️ तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल.

➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल.

➡️ या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल.

➡️ त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा व

➡️ ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल  तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा.

➡️ त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा.

➡️ त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील.

➡️ Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा.

➡️ Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा.

➡️ व आपला अर्ज सबमिट करावा

➡️ शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल  व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा  शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा.

➡️ कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल.

 ➡️ एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल.

✳️ विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया.

➡️ जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे.

➡️ क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही.

➡️ ते खालील प्रमाणे
विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

➡️ वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल.

➡️ अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल.

➡️ त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल.

➡️ त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल.

➡️ वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील.

➡️ जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास.

➡️ त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल..

➡️ त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे.

➡️ त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल

➡️ ते खालील प्रमाणे
आपल्या जोडीदाराने संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे.

➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.

➡️ त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल.

➡️ जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे.

➡️ आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल.

➡️ त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा.

➡️ आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा.

➡️ तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो.

✳️ पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा..


 
जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल लवकरच सुरू होत आहे आणि या पोर्टल वरती संवर्ग एक आणि संवर्ग दोन साठी हे सुरू होणार आहे जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर संवर्ग एक आणि संवर्ग दोन मधील पात्र शिक्षक मित्रांना अर्ज कसे करावे लागणार आहे आणि हे अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी लागेल आणि हा अर्ज कसा भरावा लागेल तर या संदर्भाचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटनवर क्लिक करा.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने