काय आहेआवळीभोजन- एक सनातन प्रथा?|धार्मिक कथा|

काय आहेआवळीभोजन- एक सनातन प्रथा?



आपले प्राचिन ऋषीमुनींना व संतमहात्म्याना सगळ्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग यांची सखोल माहिती होती.परंतू जनसामान्यांच्या पचनी पडणे जरा कठीणच किमी होते म्हणून त्यांनी हिंदू समाजात अशा काही रुढी परंपरा रूजवल्या की आपोआप त्या वनस्पतींचा वापर होत असे.अनेक व्रते ही आहारावर नियंत्रण रहावे यासाठी आहेत तर बाकीची व्रते ही निसर्गाने दिलेली फळे,फुले यांचा आस्वाद घेण्यासाठी आहेत. धन्यवाद वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संस्कार आपल्यावर झालेले आहेत त्यामुळे हिंदू धर्मात वृक्षसुध्दा पूजनीय आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे आवळा वृक्ष.
      आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णूचा वास असतो असे आपण मानतो.आवळ्याच्या सेवनामुळे पित्त प्रतिबंध, दृष्टी दोष,हृदय क्रिया सुरळीत, केस गळती,केस अकाली पांढरे होणे, कोलेस्टेरॉल, मधुमेह तसेच स्त्रियांमधील वंध्यत्वावर मात करणे असे कितीतरी औषधी गुणधर्म एकट्या आवळ्यात आहेत. तर अशा या बहुगुणी आवळा वृक्षाची पूजा व्हावी व स्त्रियांनी एक दिवस तरी त्या वृक्षाच्या सावलीत, सान्निध्यात रहावे या विचाराने कार्तिक अष्टमीला आवळीभोजनाचा कार्यक्रम आखला गेला असे वाटते.


      यावर्षी 1 नोव्हेंबर रोजी कार्तिक अष्टमी आहे आणि शक्यतो त्या दिवशी आंधळी भोजनाचा कार्यक्रम असतो.तो पौर्णिमेपर्यंत चालतो.
       आवळी भोजन तयारी
    आवळ्याचे झाड तशी खास अशी सावली देत नाही कारण त्यांची पाने फारच बारीक असतात पण भगवान श्री विष्णूचा वास असतो म्हणून त्याला विशेष मान. यादिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखालचा परिसर स्वच्छ करतात आणि चारही दिशांना तुपाचे दिवे लावतात.सगळ्या स्त्रिया आपापल्या घरातून गोडधोड पदार्थ करून आणतात सोबत आपल्या लहान मुलांना आणतात. पुरूष मंडळींना या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही त्यानंतर स्त्रिया विविध खेळ खेळतात त्यात फुगडी,गाणी म्हणणे, नवऱ्याच्या नावाची उखाणी घेणे तसेच विविध बैठे खेळ खेळतात.थोडक्यात काय तो पूर्ण दिवस त्यांच्यासाठी असतो.आनंद हौसमौज.आवळी भोजनाचे शास्त्रीय कारण कार्तिक अष्टमी म्हणजे आता 1नोव्हेंबर या दिवसांनंतर पूर्ण वाढ झालेल्या आवळ्यात C व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते व त्यांच्या सेवनाने महिलांचे अर्धे आजार दूर पळतात.तर असे आहेत आवळ्याच्या झाडाचे औषधी गुण.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने