शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन |teacher invocation compitation

 शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन 


राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न

करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप

देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम

हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते.त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यातयेत आहे.

१)पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका

२). प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४)विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन

व्यक्ती व ग्रंथपाल गट

५)अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ

अधिव्याख्याता)

तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा / DIET व गट क्र. ४ व ५ साठी

प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील

शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats App, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार


माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, DIET व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी

(प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद

यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून देखील सोबत दिलेल्या माहितीपत्रकाचे वाचन

करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी आपल्या कार्यालयातील सर्व अधिका-यांना याबाबत अवगत

करावे. या स्पर्धेची जबाबदारी एका सक्षम अधिका-याकडे देण्यात येऊन नवोपक्रम स्पर्धेची माहिती

पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-

मेल द्वारे कळविण्यात यावा.

त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना

https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि. ०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या

कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने