SNA SPARSH पोर्टलवरती कामकाजासंदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
Payee Register
Add New
Select Payee taype
1. व्हेंडर
2. आय.ए. व्होल्डींग आकाऊंट
3. विधाऊट पॅन टॅन
सर्वात आधि आपण आपल्या शाळेचे करंट आकाऊंट मॅप करुन घ्यायचे आहे. त्यासाठी आपण आय.ए. व्होंल्डींग आकाऊंट हा पर्याय निवडावा पुढे आपल्या शाळेचा टॅन क्रमांक टाकावा शाळेचे आकाऊंट ज्या नावाने ओपन केलेले आहे ते नाव टाकावे आकाऊंट नंबर बरोबर टाकावा. पत्ता पोस्टाचा पिनकोड मोबाईल क्रमांक शाळेचा इमेल आयडी टाकावा. शाळेच्या बँक खात्याच्या चेक बुकाचा किंवा स्टेटमेंटचा फोटे अपलोड करावा. शाळेचे आकाऊंट जर म्याप केले नाही तर आपण जो टीडीएस डीडक्शन करनार आहोत. तो आपणास करता येत नाही. त्यासाठी सर्वात आधी शाळेचे करंट खाते म्याप करुन घ्यावे. व्हेंडर निवडल्यानंतर त्याचा पॅन क्रमांक बँक पासबुवारील नाव टाकावे बँकेचा आएएफएसी कोड टाकावा. आकाऊंट नंबर टाकावा. पिन कोड पत्ता जिल्हा तालुका टाकावे नंतर चेक बुक चा किंवा पासबुकचा फोटो अपलोड करुन सबमिट बटन दाबावे. त्यानंतर चेकर लॉगीनला जाऊन Payee मधुन व्हेंडर ऑप्रो करुन घ्यावा.
Payee Approve
पुढे आपण जो नविन व्हेंडर तयार केलेला आहे. त्या व्हेंडरचा आकाऊंट क्रमांक निळ्या रंगात दिसेल त्या निळ्या रंगावरीत क्लिक केल्यावर आपण भरलेली माहिती दिसेल भरलेली माहिती पूर्ण पणे बरोबर असेल तर Approve बटनावर क्लिक करावे. व्हेंडर ची प्रोसीजर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बिल बनवायचे आहे.
बिल/क्लेम जनरेशन
Claim
Claim Generaction
Regular Claim
Top Up नेहमी No वरती क्लिक करावे.
खाली टेबल मध्ये आपणास तीन रो दिसतील त्यापैकी Budgt Crc या कॉलम मधील
1. 220K767 ही स्किम जनरल साठी आहे. या मध्ये 75% चे बिल बनवावे.
2. 220K865 ही स्किम एस.सी. साठी आहे. या मध्ये 13% चे बिल बनवावे.
3. 220K883 ही स्किम एस.टी. साठी आहे. या मध्ये 12% चे बिल बनवावे. जनरल एस. सी. एस. टी हे लाभार्थी असलेच पाहिजेत असे नाही आपल्याला मिळालेलेअनुदान हे वरील तीन स्किम मध्ये येत असल्याने आपले कोणतेही बिल हे तीन प्रकारे बनेल. समजा आपल्याला 2000/ दोन हजार रुपयांचे बिल बनवायचे असेल तर 2000 च्या 75% 1500/ रुपये होतात. 13% 260 रुपये होतात. 12% 240 रुपये होतात. त्या त्या स्किम मध्ये योग्य ती रक्कम टाकून पुढील प्रमाणे प्रोसेस करावी. Select Beneficiary From Regular सिलेक्ट करावी. Select Beneficiary मध्ये आपण जे व्हेंडर तयार केलेले असतील ते आपल्याला दिसतील त्या पैकी आपणास ज्या व्हेंडरला पेमेंट करावयाचे आहे तो व्हेंडर निवडावा. त्यानंतर सिलेक्ट कंपोनंट मध्ये 168 कंपोनंट आहेत आपण ज्या स्किम मधील पैसे खर्च करणार आहेत त्याच स्किमचा कंपोनंट क्रमांक निवडावा. यामध्ये जर आपण कंपोनंट निवडताना चूक केली तर आपली रिकव्हरी निघते. त्यामुळे कंपोनंट आगदी बिनचूक निवडावेत. कंपोनंट निवडताना जर आपल्याकडून चूक झाली तर आपले बिल चुकले समजावे. Gross Amount With मध्ये 75% ची जी रक्कम येत असेल ती रक्कम टाकावी. Cs Gross Amount मध्ये केंद्राची 60% रक्कम आपोआप येईल Ss Gross Amount मध्ये राज्याची 40% रक्कम आपोआप येईल. आमाऊंट टाकून झाल्यावर Add Bebeficiary यावरती क्लिक करावे. यावरती क्लिककेल्यावर वर भरलेली माहिती ही खाली टेबल मध्ये आपणास दिसेल. माहिती तपासून आपण Upload Supporting Document वरती क्लिक करुन त्यासाठी कार्यालयीन आदेश यामध्ये खर्च कोणत्या बाबीवर झालेला आहे ती बाब आपले बिल क्रमांक, दिनांक, दुकानदराचे नाव, कंपोनंट क्रमांक हे नमूद असले पाहिजे एसएमसी बैठकीत ज्या ठरावाने मंजूर झालेले आहे तो ठराव क्रमांक सचिव अध्यक्ष यांच्या सह्या असणे आवश्यक आहे. Choose File वरती क्लिक करुन आपल्या संगणकामध्ये ज्या ठिकाणी आपण ती पीडीएफ ठेवलेली आहे तेथून निवडून आपलोड करावी. फाईल आपलोड झाल्यानंतर Generate Claim वरती क्लिक करावे. क्लेम जनरेट होईल. क्लेम जनरेट झाल्यानंतर त्याची तीन पानांची पीडीएफ तयार होईल ती पीडीएफ तपासून पहावी आपले जे बिल आहे तीच रक्कम आपण टाकलेली आहे की नाही हे चेक करावे. याच प्रमाणे 13% व 12% बिल बनवावे. त्यानंतर अध्यक्ष म्हणजेच चेकर लॉगीन करुन आपण तयार केलेला क्लेम Approve करुन घेण्याची प्रोसीजर पाहूयात.
Claim approval
Approve Claim वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक टेबल मध्ये माहिती ओपन होईल त्यामध्ये Draft या रकान्यामध्ये निळ्या रंगामध्ये जे अंक दिसतील त्यावरती क्लिक करावे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढील टेबल क्लेम नंबर मध्ये निळ्या रंगाच्या अंकावरती क्लिक करावे. पुढे आपल्याला आपण तयार केलेल्या बिलाची माहिती दिसेल तसेच आपण जी पीडीएफ अपलोड केलेली आहे ती दिसेल. Approve बटन दाबावे त्यानंतर पुढे आपणासमोर हिरव्या रंगाची विंडो ओपन होईल त्या हिरव्या रंगाच्या स्क्रिन मध्ये ओटीपी व I Accpet हे दोन ऑप्शन क्लिक करावेत. व इ साईन वरती क्लिक करावे. माहिती पून्हा एकदा तपासून पहावी माहिती तपासून पाहिल्यानंतर पून्हा क्लेम मधील E Hastakshar या टॅबवरती क्लिक करावे आधार ओटीपी वर क्लिक करुन गेट ओटीपी वर क्लिक करावे आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून पुढील सूचना मान्य असल्याच्या चेक बॉक्स वरती क्लिक करावे. बेबसाईट रीडायरेक्ट होईल व तुमची पीडीएफ यशस्वी रित्या इ साईन झाल्याचा संदेश स्क्रिन वरती येईल. पून्हा गो टू एसएन ए पोर्टल वर क्लिक करून पुढील क्लेम मंजूर करावा. यानंतर ई साईन झालेल्या तीनही पीडीएफ पुढील पाथचा उपयोग करुन डाऊनलोड करुन घ्याव्यात.
रिपोर्ट
क्लेम स्टेटस
सिलेक्ट फायनान्स इयर
2025-26
पुढे आपणासमोर टेबल मध्ये माहिती ओपण होईल तीन खान्यात ही माहिती ओपन होईल
1. जनरल
2. एस. सी
3. एस.टी.
प्रत्येकाच्या समोर ड्राप्ट. आप्रूव ईसाईन अट्याच टू बिल काऊंट असे पर्याय दिसतील. यातील अट्याच टू बिल काऊंट मध्ये जेंव्हा आकडे दिसतील तेंव्हा आपले बिल हे
एमपीएसपी कडून मान्य झाले असे समजावे. हे मान्य झालेले बिल पून्हा पिएफएमएस प्रणालीवर जाऊन जनरेट होईल पीएफएमएस प्रणालीवर बिल जनरेट होत असताना
जर शाळेच्या एजन्सीच्या नावात स्पेशल CARACTER असेल तर ते बिल जनरेट होत नाही. त्यासाठी आपल्या शाळेच्या एजन्सीच्या नावातील CARACTER हे पीएफएमएस प्रणालीतून काढून टाकणे खूप गरजेचे आहे.
आता आपण ईसाईन या पर्यायातील अंकावरती क्लिक केले की आपण जेवढे क्लेम तयार केले आहेत त्या क्लेमची लिस्ट आपल्या समोर ओपन होईल ही माहिती आपणासमोर ओपण झाल्यावर पुढे डोळ्याचे चिन्ह दिसेल त्या चिन्हावरती क्लिक केल्यावर आपणा समोर आपले मागणीपत्र प्रमाणपत्र हमीपत्र व आपण अपलोड केलेला कार्यालयीन आदेश त्यासोबत जोडलेले बिल ही पीडीएफ आपणास दिसेल आपण ही पीडीएफ डाऊनलोड करुन घ्यावी. याची प्रिंट काढावी प्रिंट काढत असताना जनरल एस.सी., एस. टी. या तिनही स्किमचे मागणी पत्रांची प्रिंट काढावी व प्रमाणपत्र व हमीपत्र हे एकाच पानावर पाठपोट काढून एका बिलासाठी म्हणजे जनरल एस.सी., एस.टी साठी एकच वापरावे व त्यावरती अध्यक्ष व सचिव या दोघांच्या सह्या कराव्यात.
शाळा स्तरावर ठेवावयाची आपली व्हौचर फाईल पुढील प्रमाणे तयार करावी.
1. कार्यालयीन आदेश
2. आपले बिल दुकानदारकडून घेतलेले किंवा खर्चाची पावती असेल तर ती पावती.
3. जनरल चे मागणी पत्र
4. एस. सी. चे मागणी पत्र
5. एस. टी. चे मागणी पत्र
6. त्याच्या खाली प्रमाणपत्र व हमीपत्र एकाच पानावर पाठपोट काढून बंच तयार करावा. म्हणजे एका बिलासाठी सहा कागद तयार होतील. आपला एखादा क्लेम चुकीच्या अकाऊंट नबर गेल्यामुळे जर RBI कडून रिजेक्ट झाला असेल तर तो क्लेम आपल्याला आपल्या मेकर लॉगीन मधून REISSUE Claim या ट्याबवरती क्लिक करुन पुढे आर्थिक वर्ष 2025-26 निवडले की खाली टेबल मध्ये माहिती दिसेल त्या मध्ये तो क्लेम नव्याने पून्हा अपडेट करुन जनरेट करावा लागेल. जनरेट केलेला क्लेम पून्हा चेकर लॉगीनवरुन ई हस्ताक्षर करुन घ्यावा
लागेल. या संदर्भातील पीडीएफ होम पेजवरील डाकूमेंन्ट पॉनल मध्ये देण्यात आलेली आहे. आपण हवी असल्यास एसएनए स्पर्श पोर्टलवरील होम पेज वरुन ती डाऊनलोड करुन घेऊ शकता.
