सहजीवी पोषण|वनस्पतींची पोषणव्यवस्था |Symbiotic nutrition|plant nutrition-aapaleguruji

 

वनस्पतींची पोषणव्यवस्था   PLANT NUTRITION


  पृथ्वीवरील सर्व वनस्पती स्वयंपोषी आहे.परंतु सर्वच वनस्पती ची पोषण व्यवस्था ही सारखी नसते. वनस्पतीच्या विविध पोषण पध्दतीपैकी या ठिकाणी आपण सहजीवी पोषणा विषयी माहिती पाहणार आहोत.

सहजीवी पोषण (Symbiotic nutrition):-

       दगडफूल (Lichen) 

 दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण,आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण म्हणतात.काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषकतत्त्वे पुरवते. या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात. त्या वेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजेच दगडफूल (Lichen) होय.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने