एम.ए (एज्युकेशन) एम.एड ला समकक्ष आहे का?|MAEDU|M.ED|aapaleguruji

 एम.ए (एज्युकेशन) एम.एड ला समकक्ष आहे का?



 

राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणी अर्हता निश्चित करण्याबाबत पारितकरण्यात आलेल्या संदर्भाधीन शासन निर्णय, दि. १ डिसेंबर, १९९९ मधील खालील परिच्छेद २"इतर विषयांच्या शिक्षकांना "शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता"तसेच ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी बहिस्थ: रित्या संपादन करणे शक्य नसेल त्या ठिकाणीएम. एड. ही पदवी ग्राहय धरण्यात यावी.या ऐवजी "शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत इतर विषयाच्या शिक्षकांना "शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी नियमितरित्या संपादन करणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी बहिस्थ: रित्या प्राप्त केलेल्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा एम.एड. ही पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यात यावी, " तसेच एम.ए. (एज्युकेशन) ही पदवी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ( N.C.T.E.) च्या दि. २८.११.२०१४ च्या अधिसूचनेनुसार एम. एड. पदवी समकक्ष समजण्यात यावी." असे वाचण्यात यावे.सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०७१६१५०६२१८४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.

 संबंधित अधिसुचना पहाण्यासाठी पुढील क्लिक बटनाला क्लिक करा.

              


 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने