काय आहे सितरंग चक्रिवादळ ?|sitrang cyclone update

 काय आहे सितरंग चक्रिवादळ ?




दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि संपताना बंगालच्या उपसागरात वादळे धडकण्याची परिस्थिती देशासाठी नवीन नाही. आता बंगालच्या उपसागरावरील खोल तथा कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आणि सितरंग किंवा सित्रांग चक्रिवादळ निर्माण झाले असून हे वादळ बांगलादेश किनारपट्टीवर आले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या वादळाला थायलंडने ‘सितरंग’ हे नाव दिले आहे.

हे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आणि बंगालसह भारतीय उपखंडात या वादळाने धुमाकूळ घातला आहे. भारतीय किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  हे वादळ बांगलादेशमधील टिकोना बेट आणि सनद्वीप यांच्यामध्ये धडकून याने जीवीत व वित्तहानी झाली आहे.या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले होते,परंतु सध्या या चक्रिवादळाचा धोका महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील आहे.मात्र यामुळे ओदिशा आणि बंगालच्या किनारपट्ट्यांवर या चक्रीवादळाचा प्रभाव पडू शकतो.

सितरंग म्हणजे त्सुनामी

बंगालच्या उपसागरात गेल्या ५० वर्षांत येणारे हे आतापर्यंतचे सुमारे १७०वे चक्रीवादळ आहे. २०२०पासून चक्रीवादळाला नावे ठेवण्यात येत असून, यापूर्वी आसानी, तौक्ते अशी नावे चक्रीवादळाला देण्यात आली आहेत. या वादळाला थायलंड देशाने सितरंग किंवा सित्रांग हे नाव दिले असून, थाय भाषेत याचा अर्थ त्सुनामी असा होतो.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने