भाषा(मराठी) उतारा वाचन|शिष्यवृत्ती परीक्षा

भाषा(मराठी) 

उतारा वाचन क्र-४





आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यांमुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते.संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. त्याचा अर्थ आहे परिपूर्ण,अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही

पर्याय ठरतो. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात.निंबाच्या पानांचा लगदा कांजिण्यांवर उपयोगी पडतो. निंबाच्या डहाळ्यांना 'दातून' म्हणतात आणि त्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यांवरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी

वापरले जाते.

वरील उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने