नवोदय उतारावाचन-२|navodaya tara vachan2|aapaleguruji

 उतारा 2



एखादया कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाका. तुकडा उचलून तो निघून जाईल. तो तुमच्याकडे

पाहाणारदेखील नाही. याउलट, तुम्ही एखादया कुत्र्याला जर जवळ बोलवाल, प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवाल आणि मग त्याला काहीतरी खायला दयाल, तर तो प्रेमाने आपली शेपटी हलवेल आणि बहुधा तुमच्याशी कृतज्ञ राहील. एक पशूदेखील माणसाचे वर्तन ओळखतो. तुम्ही जर चांगले कामदेखील नीटपणे केले नाही, तरत्याच्या चेहऱ्यावर तुम्हांला कृतज्ञतेचे स्मित दिसणार नाही. त्याच्या अंतरंगात कुठल्याही प्रकारचा आनंद असणार नाही. जरी आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना मदत करीत असलो, तरीपण मदत कशी करावी याची तऱ्हा आपल्याला ठाऊक नसते.

वरील उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१). कुत्रे शेपटी हलवतात -

(A) प्रेम दाखवण्यासाठी

(B) राग दाखवण्यासाठी

(C) कर्तव्य दाखवण्यासाठी

(D) निष्ठा दाखवण्यासाठी.


२). चांगली कामे करावीत -

(A) शांततापूर्ण रीतीने

(B) नीटपणे

(C) अनोळखी माणसांसाठी

(D) सर्व प्राण्यांसाठी.

३). 'उचलणे' या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे -

(A) चिकटणे

(B) उडवणे

(C) लाथाडणे 

 (D) टाकणे.


४). दुसऱ्यांना मदत करणाऱ्यास म्हणतात :

(A) कामवाली

(B) मदतनीस

(C) धनी

(D) कुत्रा.


५). कुत्रा भाकरी उचलून घेतो आणि आपल्याकडे पाहत नाही, कारण -(A) त्याला आपली भीती वाटते.  (B) तो आपल्याला चावू शकतो.  (C) त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नसते.(D) आपण त्याला प्रेम दाखवत       नाही.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने