नवोदय उतारा वाचन-4|navodaya uttara wachun 4

उतारा 4

खादया तळ्यावर हजारो हंसांचे आगमन विस्मयकरक असते. बदकांबरोबर हंसदेखील पाणपक्ष्यांच्या वर्गात मोडतात. हे पाणपक्षी पोहू शकतात, उडू शकतात आणि पाण्यात बुडी मारू शकतात. यांच्यापैकी बरेचसे हंस स्थलांतर करणारे असल्याने, उन्हाळ्याचे महिने ते परदेशात अधिक थंड वातावरणात घालवतात आणि हिवाळा मध्य भारताच्या ऊबदार प्रदेशांत व्यतीत करतात. पाण्यात कौशल्याने वल्हवण्यास मदत करणाऱ्या पडदा असलेल्या पायांकरिता ते जास्त प्रसिद्ध आहेत. हे विस्मयकारक जीव 'वॉटरप्रूफ' असतात. त्यांच्या शेपट्यांमधून असणाऱ्या ग्रंथींतून स्रवणाऱ्या तेलाने ते आपले पंख माखतात आणि हेसुद्धा त्यांना थंड पाण्यापासून संरक्षण देते.

वरील उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. पाणपक्षी म्हणजे असे पक्षी, की जे-

(A) मध्य भारतात स्थलांतरित होऊ शकत नाहीत.

(B) पाण्यावर निरुद्देश तरंगू शकतात.

(C) पोहू, उडू आणि पाण्यात बुडी मारू शकतात.

(D) कोकलू शकतात.


2. 'सर्वांना माहीत असलेले' या अर्थाचा उताऱ्यातील शब्द आहे-

(A) विस्मयकारक

(B) स्थलांतरित

(D) प्रसिद्ध.

C) महत्त्वपूर्ण


3. पाणपक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत ?

(A) 'वॉटरप्रूफ' असण्यासाठी 

(B) ठिकठिकाणी स्थलांतर करण्यासाठी                            (C) वल्हवण्यास मदत करणाऱ्या पडदा असलेल्या पायांसाठी            (D) थव्याने हिंडण्यासाठी.


4. वरील उताऱ्यातील 'स्थलांतर करणारे' या शब्दाचा अर्थ आहे-

(A) निरुद्देश तरंगणारे

(B) हवामानातील बदलाबरोबर दुसऱ्या प्रदेशात गमन करणारे

(C) पाण्यात वल्हवणारे

(D) वॉटरप्रूफ.


5. या उताऱ्यासाठी शोभणारे एक शीर्षक असेल -

(A) हंसांचा थवा

(B) वॉटरप्रूफ

(C) पडदयाच्या पायांचे पक्षी

(D) पाणपक्ष्यांचे विस्मयकारी जग

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने