लाल टांगेवाला|lal tangewala

 लाल टांगेवाला

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला 

ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल 

टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल

लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला 

ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल      चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल

 लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला

ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला 

"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"

लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला

ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल

रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल

लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला

ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

- नारायण गोविंद शुक्ल

वरील गीत/कविता लयीत ऐकण्यासाठी पुढील व्हिडीओ पहावा.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने