नवोदय उतारा वाचन|navodaya uttara wachan

 प्र. पुढील उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.  



                        उतारा 

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक

शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत

आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील.

आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री-शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः

पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक

क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामांत

त्यांना मदत करीत आहेत.

पुढील प्रश्न सोडवा.

1). स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.

(A) आर्थिक क्षेत्रात

(B) घरकामात

(C) राष्ट्रीय विकास क्षेत्रात

(D) शिक्षणात.


2). मानवी जीवनविकासात कशाला महत्त्वाचे स्थान

आहे ?

(A) स्त्रियांना

(C) राष्ट्राला

शिक्षणाला

(D) जबाबदारीला.


3). स्त्रियांना शिक्षण दिले गेले नाही तर

समाज मागासेल

(B) समाज पुढारेल

(C) अंधश्रद्धाळू

(D) समाज पुढे जाईल.


4). शिक्षणाशिवाय माणूस कसा होतो?

(A) धाडसी

(B) जबाबदार

(C) अंधश्रद्धाळू 

(D) पाशवी.


5). उताऱ्यात कोणता जोडशब्द आला आहे ?

(A) अंधश्रद्धा

(C) मानसिक

(B) रितिभाती

(D) जीवनविकास.

वरील प्रश्नांची उत्तरे याच पेजवर प्रसिध्द केले जातिल.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने