कार्बन 14 पध्दती|carban dating information

 कालनिश्चितीची पद्धत
     कार्बन 14 पध्दती


                            विलार्ड लिबी

कालनिश्चितीच्या पद्धती : कर्ब १४ हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या

अवशेषांमधील कर्ब १४ चे प्रमाण घटत जाते. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इ. वस्तूंमध्ये तो

घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे, हे प्रयोगशाळेत मोजले जाते. शिल्लक कर्ब १४ च्या आधारे त्या

वस्तूचे वय मोजणे शक्य होते. एखादया वस्तूचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस 'कर्ब १४ पद्धती' म्हटले जाते.

कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत. मात्र 'कर्ब १४' ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. या

आणि इतर कालमापन पद्धतींच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला, की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण

केल्या, त्या संस्कृतीचा काळ एकरेखिक कालरेषेवर दाखवता येतो.

झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक-एक वलय दरवर्षी वाढत जाते. ती वलये मोजली असता झाडाचे वय

मोजता येते. लाकडी वस्तूचे वय मोजण्यासही त्याची मदत होते. या पद्धतीला 'काष्ठवलय कालमापन पद्धती' म्हणतात. कर्ब 14 च्या माध्यमातून वस्तूचे वयोमान मोजण्याची ही पद्धत विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे.या पध्दतीची माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून समजून घेण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करा.





Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने