प्रतापगडावरील पराक्रम|

 प्रतापगडावरील पराक्रम....



शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य आदिलशहाच्या नजरेमध्ये सलत होते. हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी  शिवरायांचा बीमोड करणे गरजेचे होते. म्हणून अली आदिलशहाची आई बडी बेगम साहिबा यांनी शिवरायांच्या सोबत युद्ध करण्यासाठी आदिलशाही दरबार चा एक बलाढ्य सरदार की ज्याचे नाव अफजल खान असे होते त्यास पाठवले. शिवापुर, शिरवळ मार्गे अफजलखान स्वराज्यात दाखल झाला. आणि स्वराज्यातील जनतेला त्रास देणे त्याने सुरू केले. शिवरायांनी अफजलखानाचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. आणि यांच्यासोबत भेट घडवून आणण्यात साठी संदेश पाठवला. भेटीचा दिवस ठरला, ठिकाण ठरले. ठरल्याप्रमाणे अफजल खान आणि शिवाजी महाराज हे प्रतापगडावर भेटले. परंतु भेटीदरम्यान अफजलखानाने दगा केला, आणि महाराजावर तलवारीचा वार केला. त्यावेळेस महाराजांनी  क्षणाचाही विलंब न करता हातामध्ये लपवलेला बिचवा काढला आणि तो सरळ खानाच्या पोटात घुसवला. खानाचा कोथळा बाहेर पडला. खान धारातीर्थी पडला. अशाप्रकारे खानाचा बंदोबस्त महाराजांनी केला. अशा या अप्रतिम कथेचे वर्णन या पाठांमध्ये करण्यात आलेला आहे. आणि या पाठावर आधारित प्रश्नसंच पुढील पुढे दिला आहे. तो सोडून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटन आला क्लिक करावे.

 
 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने