मंगलाष्टके|mangalastake

 ||मंगलाष्टके||





प्रारंभी विनंती करू गणपती 
विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे
आराध्य मोरेश्वरा
 चिंता क्लेश दारिद्र्य दुःख आओगे
देशांतर पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्ता बहु तोषवी ||१||


गंगा सिंधु सरस्वतीच यमुना
गोदावरी नर्मदा,
कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका
शिप्रा वेदवती महासुर नदी ख्यातागया गंडगी 
पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम् ||२||


राजा भिमक रुक्मिणीस नयनी देखोणी चिंता करी,ही कन्या सगुन वरा न्रुपवरा कावनाशी म्या देईजे,
आता एक विचारा,श्रीकृष्ण नवरा त्यासी संमरपू
रुख्मा पुत्र वडील त्यासी पुसणे, कुर्यात सदा मंगलम्||३||


मालाकार परस्परे करंगळी घालुनी गोपांगना,
गाती नाचती पाहती अवघ्या एका जगज्जिवणा
सोन्याचे मणी ओवाले, भुजगुणी गोऱ्या शशांककाणना
पाचूचे पदक स्थळ स्मर,मनी श्री देवकी नंदना ||४||


आली लग्न घटी समीप नवरा, घेऊनी यावा घरा,
गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा,  आंतर पटा ते धरा,दृष्टादृष्ट वधूवरां न करणे दोघे करावी उभी,
वाजंत्री बहु गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम्||५||


तदेव लग्न सुदिन तदैव,ताराबलं चंद्रबलं तदेव,विद्या बलमं लक्ष्मी पतेते,मनशा स्मरामी,
शुभ मुहूर्त सावधान||६||


इष्ट देवता चिंतन,सावधान
 कुलदेवता चिंतन,सावधान
ग्रामदेवता चिंतन, सावधान
लक्ष्मीनारायण चिंतन,सावधान
वराडी सावचिदे,सावधान
वाजंत्री सावचित्त,
सावधान

💐💐💐💐💐💐💐💐💐💐



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने