मार्क्विज गुग्लिएल्मो मार्कोनी|G.Marconi

 ||मार्क्विज गुग्लिएल्मो मार्कोनी||


आज आपण सर्वत्र मोबाईल फोन पाहतो. पण एक काळ असा होता, की त्यावेळी तारांशिवाय संदेशवहन हे स्वप्नच वाटत होते.पण हे सत्यात उतरवले
  गुग्लिएल्मो मार्कोनी या शास्त्रज्ञाने.

मार्कोनी आणि जर्मन शास्त्रज्ञ काल फर्डिनांड ब्राऊन या दोघांनी बिनतारी संदेशवहन यंत्रणा विकसित केली.या त्याच्या कार्यासाठी इसवी सन 1909 मध्ये दोघांना प्रतिष्ठित असे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म इटलीमधील बोलोन्या येथे 25 एप्रिल 1874 रोजी झाला त्यांचे शिक्षण इटलीत झाले. त्याना प्रथम पासूनच विज्ञान विशेषतः विद्युत या विषयात रस होता. हेंद्रिक हर्ट्झ या शास्त्रज्ञाचे रेडिओवरील संशोधन कार्य त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिली होते. ते मार्कोनी ने पुढे चालु केले. रेडिओ लहरी वापरून तारांच्या वापराशिवाय संदेशवहनाचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले.प्रथम असे संदेश पाठवूने फक्त मर्यादित अंतरासाठी शक्य झाले. परंतु मार्कोनी त्यावर समाधानी नव्हते.

1896 मध्ये मार्कोनी ने आईसह इटली सोडली व ते लंडन येथे गेले. कारण इटलीमध्ये त्याच्या संशोधनाची दखल घेतली गेली नाही. लंडनमध्ये त्यांना ब्रिटिश पोस्ट ऑफिस मधील प्रमुख इलेक्ट्रिकल इंजिनियर विल्यम प्रिस यांची खूप मदत मिळाली. त्यामुळे इसवीसन1897 मध्ये त्याला सहा किमी अंतरापर्यंत मोर्स कोड पाठवण्यात यश मिळाले. त्यानंतर जास्त अंतरापर्यंत संदेश पाठवण्यात तो यशस्वी झाला. या संदेशवहनामुळे त्यांनाआंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती प्राप्त झाली.

18 जानेवारी 1903 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी अटलांटिक समुद्र पार असलेले इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांना बिनतारी संदेश पाठवून बिनतारी संदेश वनातील एक मोठा टप्पा गाठल.

पहिल्या महायुद्धात मार्कोनी ची इटालियन सैनिकी रेडिओ सेवा केंद्राचा प्रमुख म्हणून निवड झाली. 1924 मध्ये इटलीच्या तिसऱ्या व्हिक्टर इमॅन्युएल राजाने त्यांचा मार्क्विज हा किताब देऊन गौरव केला.

हा महान शास्त्रज्ञ 20 जुलै 1937 रोजी जेव्हा स्वर्गवासी झाला तेव्हा संपूर्ण जगभरातील सर्व रेडिओ केंद्रे दोन मिनिटांसाठी बंद ठेवून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने