पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन|Celebrate Pollution Free Diwali


पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

  जय वसुंधरा...

       जय पर्यावरण... प्रदूषणमुक्त दिपावली का साजरी करावी ?

   फटाक्यांचे दुष्परिणाम  

        दीपावलीनिमित्त धोक्याचा इशारा...

 

      🌱✍🌹🌻🌿


    पर्यावरण संरक्षण व संवर्धन आपली समृद्ध व स्तुत्य परंपरा..


       माझ्या प्रिय बांधवांनो, आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेनुसार भारत देशात विविध धर्म,जाती,पंथ व संप्रदायामध्ये विविध सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. त्यापैकीच एक सण म्हणजे दीपावली.दिपावली हा सण साजरा करावा,न करावा,कसा करावा या संदर्भात मी काहीच सांगणार नाही.कारण तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक श्रद्धा,उपासना आणि परंपरेचा भाग ! आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा,परंपरेचा आणि भावनेचा सदैव आदरच ! हे माझे सत्यवचन.


🌳🙏🌹✍🌴🌴

     

       मानव प्राणी हा बुद्धिमान प्राणी आहे.म्हणूनच त्याने वास्तववादी बनून प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या ऐरणीवर तावून-सुलाखून घेऊनच स्वीकारावी.असे मला वाटते.जसे की दीपावलीच्या निमित्ताने वारेमाप व अविवेकीपणे फोडले जाणारे फटाके खरच गरजेचे आहे का ? त्याचे होणारे परिणाम कोणावर व कसे ? याचा विचार सुज्ञ व  सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या माणसाने का करू नये ?


   🌴🌴✍🌹🌻🌴🌳

       

   फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते.वायु प्रदूषणामुळे अबाल वृद्धांना श्वसनासाठी प्रचंड त्रास होतो.श्वसन संस्थेशी निगडीत विविध आजार जडण्याची शक्यता बळावते. ध्वनिप्रदूषणामुळे वातावरणातील एकाग्रता भंग पावते.प्रत्येक सजीवांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होऊन श्रवणाशी निगडित आजार जडतात. डोळ्यांचे आजार बळावतात. फटाके फोडतांना फटाके फोडणाराचे शरीर भाजू शकते. त्यामुळे त्याला अपंगत्व येऊ शकते.आगी भडकू शकतात. फटाक्यांचा प्रचंड आवाज व धुरामुळे पशु,पक्षी व प्राण्यांनाही जीवघेण्या यातना होतात. म्हणजेच आपल्या हौसेसाठी इतरांचे सुखासीन जीवन डिस्टर्ब होते.परिसर दूषित होतो व आपल्या जवळील पैशाचा विनाकारण चुराडा होतो. हे आपण समजून घेणे सर्वोच्च महत्त्वाचे आहे.

       बांधवांनो आपण सुजाण आहोत.विचारी आहोत.म्हणूनच आपल्या सर्वांकडून फटाके मुक्त, पर्यावरण पूरक दीपावलीची रास्त अपेक्षा.


    🌿🌿💐🌹🌻🌱🌱

      

       दीपावली निमित्त विविध पर्यावरण पूरक व आनंददायी गोष्टी करता येतील.याचा साकल्याने विचार होऊन आपल्या सर्वांकडून विधायक,अनुरूप व पर्यावरणपूरक कृतींची अपेक्षा. 

          आपल्या सर्वांच्या पर्यावरणपूरक दीपावलीच्या संकल्पास आमच्या पर्यावरण पूरक शुभेच्छा..


   🌿🌿🌹🌹🌴🌴


           लेखांकन



      वनश्री.जनाबापू मेहेत्रे सर

                प्रमुख

       सांस्कृतिक विभाग

  पर्यावरण संवर्धन विभाग

        राष्ट्रीय हरित सेना

        प्रसिद्धी विभाग

 देऊळगाव राजा हायस्हायस्कूल  

        देऊळगाव राजा


   🌴🌴✍🌹🌻🌳🌳

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने