Alexander Graham Bell| अलेक्झांडर ग्रॅहम बेल

 ||अलेक्झांडर ग्रॅहम बेल||



6 मार्च 1876 चा दिवस एका खोलीत अलेक्झांडर बसले होते आणि दुसर्‍या खोलीत त्यांचा सहाय्यक वाटसन बसला होता. आपल्या हातातील छोटेसे यंत्र तोंडाजवळ घेऊन अलेक्झांडर हळू आवाजात पुटपुटले 'COME HERE,WATSON,I WANT YOU'( इकडे ये वॉटसन मला तू हवा आहेस.) दुसर्‍या खोलीत बसलेल्या वॉटसनने आपल्या हातातील यंत्र कानाजवळ लावलेले होते त्या यंत्रातून त्याने अलेक्झांडर यांच्या आवाजातील ही संपूर्ण वाक्य जशीच्या तशी ऐकले आणि इतिहास घडला. ही कथा आहे टेलिफोनच्या जन्माची. त्यानंतर बेल टेलिफोन कंपनीची स्थापना करण्यात आली. जी त्या काळातील सर्वात मोठी टेलीफन कंपनी ठरली.
          अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म 3 मार्च 1847 रोजी स्कॉटलंडमधील एडिंबरो येथे झाला त्याचे वडील प्रोफेसर होते. लहानपणापासूनच अलेक्झांडर जिज्ञासू होता. तो काही ना काही प्रयोग करीत असे. त्याने अनेक वनस्पती चे नमुने गोळा केले होते.त्याचा शेजारी बेन हार्डमन हा त्याचा जिवलग मित्र होता. त्यांच्या वडिलांची पिठाची गिरणी होती. गहू दळण्यापूर्वी गव्हावरील टरफले काढावी लागत हे काम अगदी जिकरीचे असे वेळही खूप लागे. एकदा वडील या दोघा मित्रांना म्हणाले ,"तुम्ही काहीतरी निरुपयोगी उद्योग करीत बसता. त्यापेक्षा काही उपयोगी पडेल असे काम का करीत नाही?" अलेक्झांडर लगेच म्हणाला, "तुमच्या गिरणीसाठी मी काय करू शकतो ते सांगा." बेन च्या वडिलांनी गव्हावर ची टरफले काढण्याची अडचण सांगितली. 12 वर्षाच्या अलेक्झांडरने घरच्या घरी एक यंत्र बनविले. या यंत्राने गव्हावर चिटकलेले टरफले काढण्याचे काम अतिशय सुकर झाले. काम वेगाने होऊ लागले. पुढे अनेक वर्ष हे यंत्र यांच्या वडिलांनी वापरल.शालेय शिक्षणात त्यांची प्रगती बेताची होती. त्यामुळे शाळा सोडून ते लंडन येथे त्यांच्या आजोबांबरोबर राहू लागले. तेथे त्यांना शिकण्याची आवड निर्माण झाली आणि वर्षभरातच त्यांची युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबरोत प्रवेश घेतला पुढे त्यांनी मुक्या बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य हाती घेतले. 2 ऑगस्ट 1922 रोजी हा संशोधक जेव्हा मरण पावला, तेव्हा जगभरातील फोन एक मिनिटांसाठी बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने