महाज्योती MHT-CET/JEE/NEET - 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज (ऑनलाइन प्रशिक्षण व विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी पर डे इंटरनेट डाटा)

महाज्योती MHT-CET/JEE/NEET - 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज (ऑनलाइन प्रशिक्षण व विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी पर डे इंटरनेट डाटा)




 

JEE/NEET/MHT-CET-2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टेंब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल,

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवगीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी

3. सन 2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थ्यांची निवड हो त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रेः-

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजु


2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातोचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)

5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका

6. इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती

7. दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला

क. आरक्षण :-

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:-

इतर मागास वर्ग (OBC)

59%

विमुक्त जाती अ (VJ-А)

10%

भटक्या जमाती व (NT-B)

8%

भटक्या जमाती क (NT-C)

11%

भटक्या जमाती ड (NT-D)

6%

विशेष मागास प्रवर्ग (SBC)

6%

एकूण-

100%

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

ह. अर्ज कसा करावा :

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2025-27 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा,

2 . अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन जोडावे.

> अटी व शर्ती

1. अर्ज करण्याची अंतिम दि. 31/05/2025 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4 . कोणत्याही माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः संपर्क क्र- 0712-2870120/21

(स्वा.) (प्रशांत वावगे)

व्यवस्थापकीय संचालक


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने