संचमान्यते बाबतची मोठी अपडेट

सन 2024-2025 घ्या संचमान्यता पुन्हा निर्गमित करण्याच्या शासनाच्या सूचना...





विषय: संचमान्यता सन २०२४-२५ बाबत.


संदर्भ : १) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि. १५.०३.२०२४

२) आपले पत्र क्र.प्रशिसं/संमादु/ २५/टे - ५००/ ९५९, दि. २४.०२.२०२५.

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन क्र.१ शासन निर्णयानुसार सन २०२४-२५ च्या संचमान्यतेमध्ये इ. ६ वी ते ८ वी गटाकरीता कोणतीही एक इयत्ता असल्यास १० पेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक अनुज्ञेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान १ पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र. २ पत्रान्वये शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.

उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ शासन निर्णयामध्ये १ ते २० पटांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता १ ते ४/५ व इयत्ता १ ते ७/८) शाळांसाठी किमान १ शिक्षक व तद्नंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतुद आहे. सदरहू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इ. ६ वी ते ७/८ वी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत २० पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान १ शिक्षक अनुज्ञेय करुन सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित करण्यात याव्यात.

शासनाच्या अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

                      CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने