संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर हिंदी व इंग्रजी भाषेमधून ऑनलाइन प्रश्नमंजुषा... | Constitution Day Celebration

संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर हिंदी व इंग्रजी भाषेमधून ऑनलाइन प्रश्नमंजुषा... live education 


 


     



  


संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

यावर्षी संविधान दिन साजरा करत असताना राष्ट्रीय स्तरावर हिंदी व इंग्रजी भाषेमधून प्रश्नसंच ची निर्मिती करण्यात आलेली आहे सदर प्रश्नसंच सोडवण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये दीक्षा ॲप इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम आपल्या मोबाईल मध्ये दीक्षा ॲप इन्स्टॉल करून आपले प्रोफाईल अपडेट करून घ्यावे आणि नंतरच प्रश्नसंच सोडवावा. प्रश्नसंच सोडवल्यानंतर 24 तासांमध्ये आपल्या दीक्षा ॲप वर आपले प्रमाणपत्र जनरेट होईल.

सदर प्रश्नसंच सोडवण्यासाठी पुढील क्लिक बटणावर क्लिक करा.


CLICK HERE



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने