नवीन मतदान ओळखपत्र एपिक डाऊनलोड करा अधिकृत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून अधिकृत माहिती लिंक | E-EPIC PDF Download Link Info
नमस्कार मित्रांनो,
आपले मतदान ओळखपत्र जुने झाले आहे?
मूळ मतदान ओळखपत्र सापडत नाही?
काळजी करू नका आता तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मतदान ओळखपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता माहिती पुढील प्रमाणे.
सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या
संकेतस्थळावर जा त्यामध्ये वेगवेगळ्या असलेल्या पर्यायांमधून E EPIC Download या पर्यायावर क्लिक करा.
अगोदरच आपले खाते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपण तयार केले असेल तर त्यामध्ये लॉगिन करा किंवा साइन अप चे ऑप्शन वापरून आपले खाते तयार करा व लॉग इन करा.
लॉगिन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर पासवर्ड व त्याखाली सर्वात शेवटी दिलेला कॅपच्या कोड टाकून आपल्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर ओटीपी बोलवा. आलेला ओटीपी नोंदवा व लॉगिन करा.
आता ओपन झालेल्या विंडोमध्ये पुन्हा E-EPIC Download वर क्लिक करा.
आपल्याकडे मतदान ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असेल तर एपिक नंबर वर आपला मतदान ओळखपत्र क्रमांक नोंदवा व राज्य निवडा. व निळ्या रंगाच्या सर्च बटनवर क्लिक करा.
पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव दिसेल त्याच्या खालील निळ्या रंगाच्या सेंड ओटीपी बटन वर क्लिक करा आलेला ओटीपी त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये नोंदवा.
आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.