Sanch Manyata 2024-25 Latest News Update - संच मान्यता सन 2024-25 बाबत महत्वाची सूचना...
सर्व मुख्याध्यापकांना सूचना आहे की, आपल्या शाळेची सन 2024-25 ची संच मान्यता (दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेतर) Online School Portal मधील संच मान्यता प्रणाली मध्ये Working Teaching Staff व Non Teaching staff सन
2024 - 25 ची माहिती प्राधान्याने व काळजीपूर्वक भरावी.आपल्या शाळेतील माहिती संच मान्यता प्रणाली मध्ये भरताना संच मान्यता पोर्टल लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला Home, School Information आणि Working Post असे 3 पर्याय दिसतील. यापैकी प्रथम Working Post मध्ये Working Staff Teaching वर Click करावे. त्यानंतर प्रथम Medium Select करून काळजीपूर्वक माहिती भरून प्रथम Update करावी. Update केल्यानंतर तपासून भरलेले सर्व कार्यरत शिक्षक माहिती अचूक असल्याची खात्री करून Finalize करावी. त्यानंतर Working Staff Non-Teaching वर Click करून कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरावी. Update करावी. माहिती अचूक असल्याची खात्री करून नंतरच Finalize करावी.
काही शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत नसल्याने अशा शाळा शिक्षकेतर माहिती भरत नाहीत. परंतु अशा शाळांनी Non Teaching staff मध्ये शून्य टाकून Update व Finalize करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. दोन्ही माहिती म्हणजेच Teaching आणि Non Teaching कार्यरत कर्मचारी माहिती भरल्याशिवाय संच मान्यता Generate होत नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी. संचमान्यता पेजवर डायरेक्ट पोहचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.