शाळेची फी भरली नाही म्हणून केली पोलिस कारवाई.....

शाळेची फी भरली नाही म्हणून केली पोलिस कारवाई....

 
              शाळेची फी भरली नसल्याचे कारण सांगून मुलींना वर्गाबाहेर काढले. पेपर देण्याला अडथळा केला. पेपर घेण्याची पालकाने विनंती केली.फीसाठी शैक्षणिक नुकसान न करण्याबद्दल विनंती केली. प्राचार्यांनी विनंती धुडकावून लावली. प्राचार्य अन् पालक यांच्यामध्ये शाब्दिक जुंपली.त्यातून मुली आणि पालकाने मैदानावर ठिया मांडला.प्राचार्यांचा संताप अनावर झाला. प्राचार्यांचा थेट फोन सदर बझार पोलीस ठाण्यात गेला.पुढच्या काही वेळात पोलीस ठाण्याची गाडी आली.आरोपींप्रमाणे शाळकरी मुली अन् पालक यांना पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले.शिक्षण घेण्यातून उज्वल भवितव्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बालिकांना आरोपीप्रमाणे मिळाली. जणू त्यांना जेलचा धडा मिळाला. दर्जेदार शिक्षण देण्याचे डांगोरे पिटणाऱ्या यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे निघाले. हुतात्म्यांची पवित्र नगरी असलेल्या सोलापुरात शिक्षणाची बाजारीकरणाची लक्तरे वेशीवर आली.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने