पुढील शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीची पुस्तकांमध्ये होणार मोठा बदल! या वर्षी सर्वच शाळांना मिळणार द्विभाषिक पुस्तके | New books for primary education..

पुढील शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीची पुस्तकांमध्ये होणार मोठा बदल! या वर्षी सर्वच शाळांना मिळणार द्विभाषिक पुस्तके...



 

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२२/प्र.क्र २१६/एसडी - ४ दिनांक ०८.०३.२०२३


वरील संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.

१) संदर्भीय शासन निर्णय क्रमांक १ अन्वये राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २३ जून २०२२ याद्वारे अधिक्रमित करण्यात आला आहे.


२) संदर्भीय शासन निर्णय क्रमांक २ अन्वये राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ली च्या विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करून यामध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार स्वाध्यायाची पृष्ठे समाविष्ट करून नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या उर्वरित माध्यमांसाठी नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.


३) शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता २ री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यानंतर वहीची पाने समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी. गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तामिळ व बंगाली या उर्वरित माध्यमांसाठी नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.


४) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील.


५) खाजगी आणि विना अनुदानित शाळांमधील इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपुष्टात आल्यानंतर अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केल्यानुसार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.

६) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकांतील आशयामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने

मंडळाच्या विभागीय भांडारामधून विक्री झालेली पाठ्यपुस्तके परत घेतली जाणार नाहीत.

७) नियमित पाठ्यपुस्तकांपैकी एखादया विषयाचे पाठ्यपुस्तक मंडळाकडे शिल्लक नसल्यास व पुस्तकांचा संच पूर्ण होण्यासाठी कमी पडणा-या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची मागणी विक्रेत्यांनी मंडळाकडे नोंदविल्यास सदर पाठ्यपुस्तकांची नव्याने छपाई करून जुन्या किंमतीप्रमाणे सदर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. मात्र अशी पाठ्यपुस्तके विक्रेत्यांकडे शिल्लक राहिल्यास ती मंडळ परत घेणार

नाही.


८) मंडळाच्या सर्व प्रकाशनांचे पुर्नमुल्यांकन झालेले असल्याने जुनी किंमत असलेली व नवीन किंमत असलेली पाठ्यपुस्तके यावर्षी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे पाठ्यपुस्तकांवर छापलेल्या किंमतीनुसार पाठ्यपुस्तकांची विक्री करणे बंधनकारक आहे. (जुनी किंमत असलेली पाठ्यपुस्तके नवीन किंमतीने विक्री करण्यात येऊ नये.)


९) शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ रीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) हे इयत्ता १ ली व इयत्ता २ री या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.

संबंधित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.

            Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने