शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा.| Educational video creating compitation for teacher

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा....



प्रस्तावना :-
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शैक्षणिक
तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. कोविड-१९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गा-वर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडतांना दिसून येत होती. शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या
ओट्यावर, कधी निवासी पार्किंग मध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येवून ऑनलाईन प्रणालीने अभ्यास,चाचण्या पूर्ण करतांना दिसत होते. शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे. राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २,८९,५६० शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे. या शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे, ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत, इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत. उदा. शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून
बनविलेले ई-साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT, पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या
साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे
दिसून येते.शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक
स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे
शासनामार्फत आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक
स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे
शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे.

संपूर्ण स्पर्धेचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

             CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने