निवडश्रेणी प्रशिक्षण बाबतचा शासन निर्णय व प्रशिक्षण नोंदणी लिंक

निवडश्रेणी प्रशिक्षण बाबतचा शासन निर्णय व प्रशिक्षण नोंदणी लिंक 




प्रस्तावना :-

संदर्भाधिन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये खाजगी शाळेत काम करीत असलेल्या शिक्षक व

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी चौथा वेतन आयोग लागू करण्यात आला व प्राथमिक व माध्यमिक

शाळेतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना द्वि-स्तरीय / त्रि-स्तरीय वेतनश्रेणी खालील अटींच्या

अधिन राहून लागू करण्यात आली आहे.

९. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना व मुख्याध्यापकांना द्वि-स्तरीय / त्रिस्तरीय वेतनश्रेणी

राज्यातील सर्व अनुदानित अशासकीय खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक

शाळा, तांत्रिक शाळांमधील विद्याविषयक शिक्षक व अध्यापक विद्यालये यामधील 

शिक्षकांना दिनांक १ जानेवारी, १९८६ पासून केंद्र शासनाच्या धर्तीवर त्रि-स्तरीय वेतनरचना मंजूर करण्याच्या निर्णयानुसार विविध संवर्गात मूळश्रेणी, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी संबधित प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे राहील. यापुढे माध्यमिक शाळेतील

मुख्याध्यपकांचा एकच प्रवर्ग राहील व त्यांना १२ वर्षांच्या त्या पदांवरील अर्हताकारी

सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी मिळेल.

१. वरिष्ठ श्रेणीत पात्र होण्यासाठी उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

(अ) प्रशिक्षण अर्हतेसह १२ वर्षांची अर्हताकारी सेवा.

(ब) या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

(क) त्याने / तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण

करणे.वरील (क) येथील अट दक्षता रोध पार करण्यास आवश्यक राहील.

२. निवडश्रेणी त्या संस्थेतील व संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील २० टक्के पदांना सेवाजेष्ठतानुसार

अनुज्ञेय होईल व त्या संवर्गातील किमान ५ पदे असणाऱ्या प्रवर्गाचा निवडश्रेणीसाठी विचार केला

जाईल. ह्या श्रेणीस पात्र होण्यास उमेदवारास खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील:-

(अ) त्याने/तिने वरिष्ठ श्रेणीत १२ वर्षांची अर्हताकरी सेवा पूर्ण केली असली पाहीजे.

(ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे.

(क) (१) प्राथमिक शिक्षकांसाठी--प्रशिक्षित पदवीधरांची अर्हता मिळविली असली पाहिजे.

(२) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त

केली असली पाहिजे.

(३) माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित-अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी तर पदवीधर

शिक्षकांसाठी -- पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा 👇👇👇👇


                   Download


निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇


                 CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने