शिक्षकांसाठी खास मत्ता व दायित्व विवरण पत्र कसे भरावे (कोरा PDF Format Download)

शिक्षकांसाठी खास मत्ता व दायित्व विवरण पत्र कसे भरावे (कोरा PDF Format Download)





नमस्कार मित्रांनो,

      आपण सर्व मत्ता दायित्व संदर्भात एकूण तीन प्रपत्र भरून देत असतो, ही प्रपत्रे नेमकी कशी भरायची याबद्दल खूपच कमी कर्मचाऱ्यांना माहीत आहे. आपण एकाने जसे भरले तसेच त्याचे पाहून भरतो. परंतू आता असे करण्याची गरज नाही. ते तीनही प्रपत्र कसे भरायचे ते नमुण्यासह आपली ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे..


मत्ता व दायित्व प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

 

        Download




सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे करायचे असतात.परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचार्यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते.आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) फॉर्म कसे लिहायचे ते आपण पाहू.




       प्रपत्र -१


अचल मालमत्तेचे विवरण


अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही. ज्यात तुमचे घर,प्लॉट,flat किंवा दुकान ह्यांचा समावेश होत असतो.अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा असतो.





टीप :- (१) स्तंभ ४ मध्ये खालील बाबी दर्शविण्यात याव्यात.


 (अ) जेथे खरेदी, गहाण किंवा लीजद्वारे मालमत्ता संपादन करण्यात आली असेल तेथे अशा संपादनासाठी दिलेली  किंमत किंवा प्रिमियम( चढभाव )


(ब) ती लीजद्वारे ( भाडेपटटीद्वारे ) संपादित करण्यात आली असेल तर तिचे वार्षिक भाडे आणि


(क) जर वारसा, भेट किंवा अदलाबदल करून ती संपादन काण्यात आली असेल तर संपादन केलेल्या मालमत्तेचे अंदाजित मूल्य.




(२) जर शासकीय कर्मचारी हा हिंदू अविभक्त कुटुंबातील असून त्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये त्याचे कर्ता म्हणून किंवा कुटुंबिय म्हणून समवायता अधिकार असतील तर त्याने अशा संपत्तीतील त्याच्या हिश्यांचे मूल्य दर्शवावे किंवा अशा हिश्यांचे नेमके मूल्य दर्शवणे शक्य नसल्यास त्याने त्याचे अंदाजे मूल्य नमूद करावे. आवश्यक तेथे योग्य अशा स्पष्टीकरणात्मक टिपा जोडाव्यात.



नमुना म्हणून भरलेले प्रपत्र 1👆




        प्रपत्र - २


चल मालमत्तेचे विवरण




टीप :- (१)सदर प्रपत्रात खालील बाबींचा समावेश असावा.





(अ) सर्व रोकड सुलभ मत्ता, जसे रोकड, सर्व प्रकारची बँक खाती, आवर्त ठेव खाती, मुदतबंद ठेवी, कॅश सर्टिफिकेट, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती, सक्तीच्या बचत ठेवींची खाती ( आयकर दात्यांसाठी पोष्ट ऑफिस बचत खाती, पोष्ट ऑफिसमुदतबंद ठेवींची खाती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे, मुदतीच्या आवर्त ठेवी, शेअर्स, कर्जरोखे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची युनिट, हुंडया, कर्जे इत्यादी सर्व प्रकरणी ठेवीची रक्कम, मूल्य, दर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी.


(ब) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी / अंशदायी भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा पॉलिसी, पोष्टल विमा.


पॉलिसी,सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील / अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कम व प्रत्येक विमा पॉलिसीद्वारे आश्वासित असलेली रक्कम दर्शविण्यात यावी..


(क) जडजवाहीर ( एकूण मूल्य दर्शवावे. )


(ड) चांदी व इतर बहुमोल धातू व जडजवाहीर मोडत नसलेली मौल्यवान रत्ने ( सर्वाचे एकूण मूल्य ) आणि



(इ) इतर जंगम मालमत्ता जसे की मोटार गाडया, स्कूटर्स / मोटार सायकल, रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर, रेडिओ / रेडिओ ग्राम / टी. व्ही. सेट ( दूरचित्रवाणी संच ), ज्याची किंमत रु. २०००/- पेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तू ( रोजच्या वापरातीलम्हणजे कपडे, भांडी, पुस्तके, काच सामान इत्यादी वस्तू वगळून ) प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे मूल्य दर्शविण्यात यावे.




(२) वरील टीप (१) (अ) मध्ये दर्शविलेल्या रोकड सुलभ मत्तेबाबत टीप (१) (ब) मध्ये दर्शविलेल्या भविष्य निर्वाह निधी / अंशदायी भविष्य निर्वाह निधी आणि विमापत्रे ( इन्शूरन्स पॉलिसीज ) याबाबतचे वर्णन स्तंभ २ मध्ये नमूद करावे. ( बँकेचेनाव, पत्ता, पोष्ट ऑफिसचा पत्ता, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या शाखेचा पत्ता, कंपनी / फर्म / ॠणको यांचे पत्ते ) इत्यादी पूर्ण तपशिल स्तंभ ३ मध्ये नमूद करण्यात यावा.


(३) भाडे खरेदी तत्वावर व हप्तेबंदीवर घेतलेल्या वस्तूंच्या पोटी हे विवरण सादर करण्याच्या दिनांका पर्यत भरलेली रक्कम नमूद करावी.



नमून म्हणुन भरलेले प्रपत्र 2




प्रपत्र – ३


दायित्वाचे विवरण पत्र




टिपा:-


(१) दोन महिन्यांच्या मूळ वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही.



(२) या विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रिम, घरबांधणीसाठी अग्रिम (वेतन अग्रिम आणि प्रवास भत्याचे अग्रिम, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून घेण्यात आलेली अग्रिमे आणि विमा पत्रावर आणि कायम ठेवीवर काढलेली अग्रिम याव्यतिरीक्त) इत्यादी सारख्या शासकीय कर्मचाऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या अग्रिमांचाही अंतर्भाव करावा.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने