सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन निर्णय संपूर्ण माहिती|Download Continuous comprehensive assessment GR

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन निर्णय संपूर्ण माहिती|Download  Continuous comprehensive assessment GR




महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सुधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २००६-

०७ पासून सुरू असून नवीन अभ्यासक्रमाबरोबरच इयत्ता पहिली ते आठवीच्या (प्रार्थामकस्तर)

विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३१ ऑगस्ट २००४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मूल्यमापनपद्धती विहित

करण्यात आली होती.

९.

केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ ( अ )

मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वर्षे

वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, [Right of Children

to Free and Compulsory Education. ACT 2009 (No. 35. 2009)] केंद्र शासनाने

पारित करुन तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिध्द केला आहे. तसेच भारत

सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१/०४/२०१० पासून संपूर्ण

भारतात (जम्मू व काश्मीर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.

२.

समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये,

सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. यादृष्टीने हा अधिनियम 

३.

संदर्भाधीन दिनांक १६ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये इयत्ता पहिली ते आठवीच्या

वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे व त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाबत

आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम २९ (१) व (२) नुसार इयत्ता

पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याची बाब शासनाच्या

विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक- २००९/प्र.क्र.२९२/प्राशि-१,

दि. १० मे २०१० अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९,

दिनांक १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना

कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही. सदर अधिनियमामधील कलम २९ (१) व (२) नुसार

सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी पुढीलप्रमाणे सातत्यपूर्ण

सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

साततत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा हेतू

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन

करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय.

त्यामध्ये दोन प्रकारच्या उद्दिष्टांवर भर देणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिले उद्दिष्ट

विद्यार्थ्याच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन (Continuity in Evaluation

and Assessment of Broad based Learning) आणि दुसरे उद्दिष्ट वर्तनातील दृश्यरुप

किंवा वर्तन निष्पत्ती (Behavioural Outcomes).

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन

पद्धतींचा समावेश राहील.

संपुर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

 

              Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने