बदली पात्र प्रक्रिया व पुढील अपडेट|जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया लेटेस्ट अपडेट

📣📣📣📮📮📮📣📣📣


 बदली पात्र प्रक्रिया व पुढील अपडेट


                   🛑🛑🛑


✳️बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया (Eligible Round-1) 31 जानेवारी रोजी पूर्ण होईल.






➡️ बदली झालेल्या शिक्षकांची यादी,विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांची यादी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी EO/CEO लॉगिनला उपलब्ध होईल.



➡️ या याद्या प्रसिद्ध करताना प्रत्येक जिल्ह्याच्या कामकाजावर अवलंबून आहेत जे जिल्हे काम पूर्ण करतील ते याद्या प्रसिद्ध करतील आणि ज्या जिल्ह्यांचे काम पूर्ण होणार नाही असे जिल्हे एक ते दोन दिवस रिक्त पदांच्या याद्या व बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास लागू शकतात




✳️ पुढील अपडेट



 


 ➡️ 1 फेब्रुवारी 2023




जिल्हा निहाय रिक्त पदांच्या याद्या प्रकाशित करणे




जिल्हा निहाय  विस्थापित  शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणै




जिल्हा निहाय बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे




➡️ 2 फेब्रुवारी 23 ते 7 फेब्रुवारी 23




बदली पात्र टप्प्यामधील विस्थापित शिक्षकांना पसंती क्रम भरणे



➡️ 8 फेब्रुवारी 23 ते 12 फेब्रुवारी 23




विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया चालविणे




➡️ या वरील बदली प्रक्रियेतील राऊंडमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थातच त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झालेले असतील अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागेल




 ➡️ तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिट मधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते  अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिटमध्ये जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आहेत  त्या शाळेवर राहतील




➡️ तसेच दोन बदली पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून अर्ज केलेला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागणार नाही




➡️ किंवा त्या एक युनिट मधील ज्या शिक्षकाने अर्ज केलेला असेल त्या शिक्षकाची बदली झालेली असेल व त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंती क्रम भरावा लागेल




➡️ किंवा एक युनिट मधील दोन्हीही पती-पत्नी शिक्षक विस्थापित झालेले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंती क्रम द्यावा लागेल




➡️ या प्रक्रियेमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांचा समावेश होईल इतर विस्थापित शिक्षकांचा समावेश होणार नाही.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने