शिक्षक बदली पोर्टल वरील शिक्षकांचे Profile मध्ये त्रुटया असलेल्या शिक्षकांनी APPEAL TO CEO करणेबाबत-शिक्षणाधिकारी यांचे आदेश|जिल्हांतर्गत बदली अपडेट .

शिक्षक बदली पोर्टल वरील शिक्षकांचे Profile मध्ये त्रुटया असलेल्या शिक्षकांनी APPEAL TO CEO
करणेबाबत.


 
संदर्भ :- महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था- १४ दिनांक ७ एप्रिल, २०२१
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सूचित करण्यात येते की, Online बदली पोर्टल वर (TEACHER TRANSFER
MANAGEMENT SYSTEM) ज्या शिक्षकांना त्यांच्या Profile मध्ये त्रुटया आढळून आलेल्या होत्या, अश्या शिक्षकांना Appeal To EO करण्याबाबतची सुविधा दिनांक 30/11/2022 ते 03/12/2022 पर्यंत Online बदली पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेली होती.त्या अनुषंगाने Appeal to Eo केलेल्या एकूण 53 शिक्षकांचे Appeal दिनांक 05/12/2022 ते 10/12/2022 या कालावधीत Approve Or Reject करून निकाली काढण्यात आलेले आहेत.तरी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिलेला निर्णय मान्य नाही किंवा ज्यांना पुन्हा आपल्या शिक्षक
PROFILE बाबत अपील करायचे आहे, अश्या सर्व शिक्षकांनी दिनांक 11, 12 व 13 डिसेंबर 2022 रोजी आपल्या लॉगिनवरून APPEAL TO CEO करण्याबाबतच्या सूचना सर्व शिक्षकांना आपलेस्तरावरून देण्यात याव्या.APPEAL TO CEO केलेल्या शिक्षकांचे अपिलवर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर दिनांक 14 ते 17 डिसेंबर, 2022 या कालावधीत योग्य तो निर्णय देतील. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल, याची शिक्षकांनी नोंद घ्यावी
तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे Login वरून आपले तालुका अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांचे
Profile पडताळणी करून संबंधीताचे Profile मधील माहिती मध्ये त्रुटया आढळून आल्यास संबंधीत
शिक्षकास तसे कळवून Online बदली पोर्टल द्वारे Appeal to CEO दाखल करण्यास कळवावे.
Online बदली पोर्टलवर चुकीच्या माहितीमुळे एखादा शिक्षकाची बदली झाल्याने न्यायालयीन प्रकरण
उद्भवल्यास यास सर्वस्वी आपण व संबंधीत शिक्षक जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी. Online बदली पोर्टल वरील माहिती अद्यावत करण्याची ही शेवटची संधी असल्याने सर्वच शिक्षकांना न चुकता त्यांचे Online बदली पोर्टल वरील Profile पडताळणी करण्याकरीता सुचित करण्यात यावे. यानंतर कोणत्याही शिक्षकाच्या Online बदली पोर्टलवरील माहिती मधील त्रुटीबाबत काहिही ऐकुण घेतल्याजाणार नाही, याची सर्व शिक्षकांना जाणीव करून देण्यात यावी.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने