कोरोना व्हायरस बाबत नविन अपडेट|corona virus

 कोरोना व्हायरस बाबत नविन अपडेट....






सध्या कोरिया, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये वाढती कोरोनाची प्रकरणं पाहता केंद्रानं एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासंदर्भात केंद्रानं राज्यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये जिनोम सिक्वेंसिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल पाठवायला सांगितले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला देखील याबाबत पत्र लिहिलं आहे. यामध्ये देखील जिनोम सिक्वेंसिंगवर लक्ष
ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जिनोम सिक्वेसिंगद्वारे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळू शकेल. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रसाशित प्रदेशांना एक पत्र लिहून जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणात अचानक वाढ होत. असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पॉझिटिव्ह प्रकरणांच्या सँपल्सची जिनोम सिक्वेंसिंग गरजेची असल्याचं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस बाबतची सकाळ वृत्तसमुहाने अपडेट दिलेली बातमी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


 


दैनिक सकाळ यांच्या सौजन्याने 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने