सोळा महाजन पदे
Gajanan
१)कोसल
• कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी
झाला होता.
• या राज्यातील श्रावस्ती,कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती.
• श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती.
• गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते.
• कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.
• कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.
२)वत्स
• वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता.
• कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय.
• हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
● कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम
बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते.
• राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.
• राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे
स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले.
३)अवंती
●मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते.
● उज्जयिनी (उज्जैन) हे नगर ही त्याची राजधानी होती.उज्जयिनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
• अवंतीचा राजा प्रयोत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.
● नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात
विलीन झाले.
४)मगध
• बिहारमधील पाटणा,गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते.
• राजगृह (राजगीर) ही त्याची राजधानी होती.
• महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा
बांधला होता.
• जीवक हा प्रसिद्ध वैदय बिंबिसाराच्या दरबारात होता.
• बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते.
महाजन पदावर आधारित प्रश्नसंच सोडवून स्वत:ची प्रगती तपासून पहा.
Gajanan