पाणी-पाऊस|मराठी कविता@aapaleguruji

       पाऊस-पाणी 




 

आभाळाचे धुके दाटूनिया आले,

अधारल्या दिशा रान धुंद झाले॥धृ॥


थांबला मरुत झाडे स्तब्ध झाले,

पाखरांच्या किलकिलाटाने सारे रान जागे केले ॥१॥


पानातुन झाडाच्या पाहूना बोलला,

कुडकुडू आवाजाने सारे रान दनानले॥३॥


सरला पाऊस दिनकराचे आगमन

प्रकाशाने अंधारावर अतिक्रमण केले ॥४॥


आभाळाचे धूके विरुनिया गेले,

उजळल्या दिशा रान जागे झाले॥५॥

पाऊस पाणी कविता पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

GAJANAN  




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने