शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार|Teacher appointment|Pavita portal

 शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार....




 
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड
होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती “अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी” यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यातआली आहे. दरम्यानच्या काळात, पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदरकार्यपध्दतीमध्ये बदल/सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त, शिक्षण यांच्या दिनांक १२.१०.२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टिएनटि-१, दि०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे/सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

 सदर शासननिर्णय  डाऊनलोड करण्यासाठी पुढील क्लिक बटनवर क्लिक करा.

             

 
              


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने