प्रात्यक्षिक: लोणचे तयार करणे(इ.५वी)|परिसर अभ्यास-१|lemon pickle|

प्रात्यक्षिक: लोणचे तयार करणे(इ.५वी)



   



 

साहित्य :-
                मध्यम आकाराची काचेची बरणी,सुरी, चमचा, ७-८ लिंबे, पाव वाटी मीठ, २ चमचे तिखट, दीड वाटी साखर.

कृती :-
         बरणी स्वच्छ व कोरडी करून घ्या.
सुरीने प्रत्येक लिंबांच्या आठ फोडी करा. या फोडी बरणीत भरून त्यावर साखर, मीठ आणि तिखट घाला. हे मिश्रण कोरड्या लाकडी किंवा स्टीलच्या चमच्याने नीट हलवा, म्हणजे सर्व घटक मिसळले जातील. त्या बरणीच्या तोंडावर स्वच्छ कापड घट्ट बांधून बरणी कडक उन्हात सुमारे दहा दिवस ठेवा. रोजच्या रोज चमच्याने ढवळा. ढवळताना तुमचे हात व चमचा दोन्ही स्वच्छ व कोरडे ठेवा.
जेवणाबरोबर हे मुरलेले लोणचे खाऊन बघा !

परिरक्षके :-
लोणची, मुरांबे टिकवण्यासाठी त्यांत
काही विशिष्ट पदार्थ घालतात. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना 'परिरक्षक' असे म्हणतात. साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल,व्हिनेगर ही परिरक्षकांची उदाहरणे आहेत.

लोणचे बनवण्याच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ वर क्लिक करा.

             




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने