ग्वालियर चे शिंदे घराणे |Gvaliarche Shindhe@aapleguruji

 ग्वालियर चे शिंदे घराणे


   

ग्वालियरचे शिंदे : थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे याचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले.राणोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी व महादजी या त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली. महादजी शिंदे माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महादजींना दिली. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. उत्तर
भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धपद्धती उपयुक्त ठरणार नाही, हे त्यांनी ओळखले. त्यांनी डिबॉईन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले.
            पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे, असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. त्यांनी बंगालच्या
सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशाहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशाहाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खूश होऊन
बादशाहाने त्यांना 'वकील-इ-मुत्लक' हे पद देऊ केले. याचा अर्थ त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी देऊ केली. त्यांनी ते बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले.
या पदामुळे दिल्लीची पातशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली. कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा
सावरणे हे सोपे काम नव्हते. महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इ.स.१७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार
पाहिला.पानिपतच्या लढाईस जबाबदार असलेल्या नजीबखानाचे वारसदार अदयाप रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. नजीबाचा नातू गुलाम कादिर
याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशाहाचा आणि बेगमांचा छळ केला. बादशाहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला. त्याने
बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशाहाला परत केली. बादशाहाची दिल्लीच्या गादीवर पुनःस्थापना केली. अशा रीतीने महादजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पत परत मिळवूनदिली. दिल्लीच्या बादशाहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले.पेशव्यांच्या गृहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठी मुत्सद्द्यांना हे मान्य नव्हते.त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ ठरला. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानवर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता.मुंबईहून इंग्रज बोरघाटमार्गे मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्यसामग्री मिळू दिली नाही.उभय सैन्याची गाठ वडगाव (सध्याच्या पुणे-मुंबईरस्त्यावर) येथे पडली. या लढाईत इंग्रजांचा पराभव
झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले.दिल्लीवर इ.स.१८०३ पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. 


इंग्रजांनी भारत जिंकला, तो मराठ्यांशी लढाया
करून, हे लक्षात घेतले म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येते. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी
येथे त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे.शिंदे छत्री, वानवडी-पुणे शिंदे, होळकर व भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली.शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी
व तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी प्रबळ बनवले. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी या आरमारी सत्तांना धाकात ठेवले आणि
मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचे रक्षण केले.सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली.
खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले.तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी
गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले.मध्यप्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे साहाय्य केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली.महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेले असताना नाना फडणवीस याने दक्षिणेकडील राजकारणाची सुत्रे सांभाळली.या कार्यात पटवर्धन,हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्यांना साथ दिली.त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले.इंदौरचे नाना फडणवीस नागपूरचे भोसले ग्वालियरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम,नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते.
उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले.महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतरमात्र या सत्तेला उतरती कळा लागली. या काळात
रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता.त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते. उलट, अनेक दोषच होते. 
शिंदे घराण्यावर आधारित प्रश्नसंच पुढे दिलेला आहे.तो सोडवून स्वत:ची प्रगती तपासून पहा.

 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने