वासरु-मराठी कविता-कवि अनिल|Marathi kavita vasru

    ||वासरु||



 

ओढाळ वासरू रानी आले फिरू

कळपाचा घेरू सोडूनिया,

कानामध्ये वारे भरूनिया न्यारे,

फेर धरी फिरे रानोमाळ.

मोकाट मोकाट अफाट अफाट,

वाटेल ती वाट धावू लागे.

विसरूनी भान, भूक नि तहान,

पायांखाली रान घाली सारे.

थकूनिया खूप सरता हुरूप,

आठवे कळप तयालागी.

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,

आणखीच भागे भटकत.

पडता अंधारू लागले हंबरू,

माय! तू लेकरू शोधू येई.

वासरु कविता तालासुरात ऐकूया,


 




वासरु या कवितेवर आधारित प्रश्नसंच पुढे दिला आहे तो सोडवून स्वत:ची प्रगती तपासून पहा.


 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने