स्वराज्याचा कारभार -अष्टप्रधान मंडळ|Astpradhan mandal-swarajyacha karbhar std 7

 स्वराज्याचा कारभार -अष्टप्रधान मंडळ 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.स्वराज्यास इतर शेजारच्या राज्यांनी मान्यता द्यावी म्हणुन महाराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचे ठरवले आणि सन 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटात पार पडला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे,सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड व ठाणे या जिल्ह्यां मधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मिळनाडू राज्यांतील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.


अष्टप्रधान मंडळ : 

महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोईसाठी त्याची आठ खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुखनेमला. आठ खात्यांत आठ प्रमुख मिळून ‘अष्टप्रधानमंडळ' बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे, हा महाराजांचा.. अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी


हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इनामे,वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत; रोख पगार मात्र भरपूर दिला.

स्वराज्याचा कारभार या पाठावरील स्वाध्याय सोडवून स्वत:ची प्रगती तपासून पहा.

 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने