जिल्हास्तरीय बदली अपडेट माहिती

 जिल्हानंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्त्वाचे





जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया.

✳️ जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह विश्लेषण. 



✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे.सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम  4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल.

      

➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे.


https://ott.mahardd.in


 


✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022.                                   

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा

जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल. 


➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

 ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल.

 

➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा.


➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नका देण्याचा प्रयत्न करावा.

हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो. 


✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस).

 

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या  आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा. 


➡️ या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील.


➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही.


✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस).


➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या  वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.


➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात.


➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी.


➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो.

Gajanan  

✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा.


➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.


➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग  10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास  त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील  वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून.


➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल.


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात.


➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात.


✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस).


➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे


➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील.


➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल.


✳️ विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)


➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल.


 ➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी  पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत


✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस).

➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.


 ➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल


➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल.


✳️बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने