शमी का पेंड|शमीवृक्ष|shami ka ped

 शमी वृक्ष

 (शास्त्रीय नाव : Prosopis spicigera - प्रॉसोपिस स्पिसिगेरा) 



           ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिची पाने गणपतीला वाहतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे कापडामध्ये गुंडाळून शमी वृक्षावरील एका ढोलीत ठेवली होती. काहीतरी अमंगळ आहे असे समजून कोणीही त्यांना हात लावला नाही.शमी वृक्ष प्रतिकूल हवामानातही उत्तम रितीने वाढतो. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, लहान आणि एका दांड्यावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शेंगेत गोड, घट्ट गर असतो. त्यात लांबटगोल पण चपट्या बिया बसविल्यासारख्या असतात. पिकलेल्या शेंगा आपोआप फुटत नाहीत, शेंगेत कप्पे असतात. एका कप्प्यात एकच बी असते.
                     
      शमीच्या लाकडाचा उपयोग बाभळीसारखाच इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात शमीच्या समिधा असतात, बाभळीच्या नसतात. शमीच्या अंगी अग्नी असतो.दुष्काळात शमीची पाने गुरांसाठी चारा म्हणून देतात. शेंगाही उत्तम खाद्य आहे. पूर नियंत्रणासाठी शमी हा उत्तम वृक्ष आहे. झाडाच्या सालीपासून विहिरीतल्या पाणी काढण्याच्या मोटेकरता "नाडा' तयार करतात. पाने, झाडावर, पानांवर येणाऱ्या गाठी, शेंगा औषधी आहेत.
 वरील उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने