जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग-२ मध्ये कोणते कर्मचारी येतात.

 जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग-२ मध्ये कोणते कर्मचारी येतात.....


  जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पुढील कर्मचारी येतात.जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळया जिल्हयात असल्यास

अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत

संबंधित दांपत्यापैकी एकाने त्याचा जोडीदार ज्या जिल्हयात कार्यरत असेल, त्या जिल्हयात

बदली मिळण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

या विशेष संवर्गांतर्गत अर्ज करतांना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य

जिल्ह्यात बदली हवी असल्यास पती-पत्नीची जोडी एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्या

दोघांपैकी सेवाज्येष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता ग्राह्य

धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात

त्यांचे निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य मिळेल.


पती-पत्नी एकत्रीकरणातंर्गत असणारी वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे

त्यांच्या बदलीचा प्राधान्यक्रमही याच क्रमवारीनुसार राहील.

क. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.

ख.पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी

असेल तर.

ग. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी

असेल तर.

घ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त

संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका / नगरपालिका.

च. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या

सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

छ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील

कर्मचारी असेल तर

वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी

त्यांच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांना

दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार

करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक ही एक असल्यास इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनांव

प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने