जिल्हातंर्गत बदली संवर्ग-१ मध्ये कोणते कर्मचारी येतात

 

विशेष संवर्ग शिक्षक भाग १

 जिल्हांतर्गंत बदली प्रक्रिया ही चार संवर्गा मध्ये पार पाडली जाते.तर संवर्ग 1 मध्ये कोणत्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे.



विशेष संवर्ग शिक्षक भाग १ :- 
या संवर्गात पुढील अटींची पुरवण्या करणारे कर्मचारी येतात.
क.   पक्षाघाताने आजारी कर्मचारी        (Paralysis).
ख.  दिव्यांग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक
१४.०१.२०११ मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक),मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक. (पालक म्हणजे आई वडील किंवा तेन सल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत, असे शिक्षक.
ग.  ह्रदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.
घ.  जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी /डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी.
च.  यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
छ.  कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.
ज. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी.
झ.  थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारेआजार{उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiencyव इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ).



ट. माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा.
ठ. विधवा कर्मचारी.
ड. कुमारिका शिक्षक.
ढ. परित्यक्ता / घटस्फोटीत महिला कर्मचारी.
प. वयाने त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी.
फ. स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांनादोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार
करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांकदेखील एकच असल्यास इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे
आडनांव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने