कोराटीचे फुले

 ||कोराटीचे फुले||




ओसाड उजाड माळरानावर;
कोराटीची जाळी असे हिरवीगार||ध्रु||

शरीर चोपडे वर काटेरी मखमल;
पाने पांघरती हिरवी शाल,
पुष्पे लाल पिवळे सोनेरी;
सुमने लगडती तिच्या फांद्यावरी ||१||

बहरली कोराटी श्रावणात;
सडा मोत्यांचा पडला तिच्या अंगणात,
पाने फुले न्हाहती पावसात;
चिंब भिजती काया श्रावणाच्या सरीत ||२||

पुष्पे उमलती वाटे मनास हारीक;
सुमने कोराटीची असे रे नाजूक,
गंध पसरे रानात अपसूक;
मधुकर येती होवून भाऊक||३||

फुले कोराटीची दिसाया चांगली;
जगाच्या उद्धारा तया काट्यावर टांगले,
अशीच माणसे पाहिजेत जन्मले;
दिन दलितास म्हणे जो आपुले ||४||











Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने