नवोदय परीक्षा उतारा वाचन क्र३

 पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा.


दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा. पाण्यासाठी वणवण करणे, हा रोजचा दिवस अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच! अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटू ची नाव आहे कविता राऊत आणि त्या पाण्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविता चे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली. आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठ या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत.
 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने