General knowledge 1 | Apala Maharastra

 सामान्यज्ञान भाग-1

सामान्यज्ञान माहिती पुढीलप्रमाणे:-

*आपला महाराष्ट्र*



1) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

=>1 मे 1960

2) महाराष्ट्र राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे होऊन निर्माण करण्यात आले आहे?

=> गुजरात

3) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

=>कळसुबाई

4) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

=>गोदावरी

5) पश्चिम घाट असे महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेस म्हटले जाते?

=>सह्याद्री पर्वत

6) महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता आहे?

=>पालघर

7) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा काही भाग वेगळा करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे?

=>ठाणे

8) महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?

=>मुबई शहर

9) महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

=>अहमदनगर

10) महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चादरी साठी प्रसिद्ध आहे?

=>सोलापूर

11) राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

=>बुलढाणा

12) संत तुकाराम हे महाराष्ट्रातील कोणत्या गावचे राहणारे होते?

=>देहू

13) संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय होते?

=>तुकाराम बोल्होबा आंबिले

14) समर्थ रामदास यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

=>जालना(जांब समर्थ)

15) प्रसिद्ध असे विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे?

=>पंढरपूर

परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा💐💐💐💐

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने